dr.satish best web design developer for mac

जरळी ग्रामपंचायत :

महाराष्ट्रा मधील कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये नदी काटी निसर्गरम्य सौंदर्यात वसलेले एक लहानसे खेडे म्हणजे जरळी हे गाव . या गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना 3 मार्च 1938 रोजी झाली.गावामध्‍ये सार्वजनिक विहीरी उपलब्‍ध आहेत. तसेच गावातील लोकांनी बोरवेल देखील खोदले आहेत. या पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो. जरळी गावामध्ये रस्ते दुरूस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, गटार बाधणे, इ. कामाची अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत केली जाते.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

जरळी ग्रामपंचायत ही सन 1938 पासून कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. तसेच दर पाच वर्षांनी पंचायत निवडणुका लढवल्या जातात व गावचा कारभार पाहण्यासाठी, गावचा विकास करण्यासाठी गावचा  प्रथम नागरिक म्हणून सरपंचांची नेमणूक केली जाते. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंच
सौ. गौरी उमेश लोंढे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. अरुण तानाजी सोनार

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री.मारुती अर्जुन नांंगरे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Jarali Grampanchayat
A/p Jarali Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416551

CONTACTS
Phone : 9096253548
Office : 02327 – 252214